नविन शिका

नविन शिका
नमस्कार मित्रांनो,
एक छानसा सेमिनार सुरु आहे, वक्ता बोलतोय मागे मोठया पडद्यावर तो बोलत असताना त्या अनंषंगाने वेगवेगळया स्लाईडस दिसताहेत. बोलता बोलता तो हातातल्या छोटयाश्या रिमोट ने छानपैकी नकळत स्लाईड बदलतोय....
किती छान आणि हाय टेक वाटतय ना ?
मला माझ्या वर्गात ही असंच प्रेझेंटर वापरता आलं तर ?
शिकवताना लॅपटॉप पुढयात न ठेवता मी मुलांमधून फिरतोय आणि मुलांशी गप्पा मारता मारता विषयानुसार चित्र बदलतोय.. यासाठी मला लागेल प्रेझेंटर किंवा एअर माऊस...
एक मिनिट ...
माझ्याकडे एंड्रॉईड फोन आहे ना !
चला मग हे कसं साध्य करता येईल ते पाहूत.
नेहमीप्रमाणे google Play Store वर जा, आणि सर्च बॉक्स मध्ये Unified remote सर्च करा. App इंन्स्टॉल करुन घ्या.
लॅपटॉप किंवा पी.सी. वर https://www.unifiedremote.com/ या साईटवर जा. डाऊनलोड करुन सर्वर इन्स्टॉल करा.
पी. सी. वर सर्वर रन करा. व आता फोन मध्ये App ओपन करा फोन सर्वर ला wifi किंवा Bluetooth ने कनेक्ट होईल.
app मध्ये रिमोट सिलेक्ट करा..
आणि रिमोट काम करायला लागेल.
या App मध्ये रीमोटचे विविध प्रकार उपलब्ध आहेत.
बेसिक इनपुट यात टचपॅट व किबोर्ड आहेत
फाईल मॅनेजर
कीबोर्ड
मेडीया
पॉवर
स्क्रोल व्हील
स्लाईड शो
स्पॉटीफाय
स्टार्ट
टास्क मॅनेजर
विंडोज मेडीया सेंटर
विंडोज मिडीया प्लेयर
व्ही एल सी
ऑनलाईन टेस्ट बनवण्यासाठीआपण http://www.classmarker.com/ या लिंकवर क्लिक करा व register free वर क्लिक करून रजिस्टर करा.व त्यानंतरआपला login id व password टाकून login करा.educational test वर क्लिक करून new test वर क्लिक करा या टेस्टला नाव द्या प्रश्न add करून आपली टेस्ट बनवा त्यानंतर लिंक शेअर करा.    येथे test बनविण्यासाठी HTML कोडींग ची आवश्यकता नाही.